विदर्भात पावसाचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. 

आज पहाटे भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगाव येथे घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यातील कोंढी येथील नाल्याच्या काठावरील पूर्ण वस्ती पाण्यात बुडाली. मराठवाड्यातही आणखी सहा जण मृत्युमुखी पडले.

राजेदहेगाव (जि. भंडारा) येथे सुकरू खंडाते (३२), त्यांची पत्नी सारिका (२८) व मुलगी सुकन्या (वय तीन) असे खोलीत झोपले असता आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांच्या अंगावर घराची भिंत व छत कोसळून तिघांचाही जागीच मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातच कोंढी गावाजवळील नाल्याला आलेल्या पुराने नवीन वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले. बचाव पथकाने १६ कुटुंबांसह १५ जनावरांना सुरक्षितस्थळी हलविले. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत सरासरी ११३ मिलिमीटर पाऊस झाला. 

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्‍यात आमडी नाल्याला आलेला पूर पाहायला गेलेला कामगार सुरेश सातपैसे (वय ४२) पुरात वाहून गेला. नागपूर शहरातून वाहत असलेल्या पिवळ्या नदीतही एक मुलगा वाहून गेला.

राज्यात इतरत्रही झोडपले
नांदेड -  पुराच्या पाण्यात चार वाहून गेले
परभणी - गंगाखेड तालुक्‍यातील चार गावांचा संपर्क तुटला
हिंगोली - कयाधू आणि वैनगंगेच्या पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान
नाशिक - गोदावरीची वाढलेली पातळी कायम
जळगाव - हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडले, तापीला पूर
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत भीजपाऊस, तर औरंगाबादेत रिमझिम
जालना जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ३१.७५ मिलिमीटर पाऊस

Web Title: heavy rain in vidarbha