esakal | तिवसा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

tiwsa

तिवसा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिवसा /प्रशिक मकेश्वर : काल मध्यरात्री सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील काही भागातील शेतीत पाण्याचे मोठे डोब साचल्याचे चित्र आज सकाळी पहायला मिळाले तर वरखेड येथील सूर्यगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने गावातील बाजारपेठ परिसरातील पाणटपऱ्या पाण्याखाली आल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसापासून जोरदार हजेरी लावल्याने लहान-मोठी नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे, तालुक्यातील सातरगाव, शेंदुर्जना बाजार, वरखेड या भागातील नदीपात्राची पाण्याची पातळी वाढली असून पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

तर नदीकाठावर असलेल्या शेतात पाणी शिरल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा तिवसा महसूल विभागाच्या वतीने देण्यात आला आहे,तसेच नळ दमयंती सागर उर्ध्व वर्धा प्रकल्प धरणात पाणी पातळी ३४२.०३,पाणीसाठा :९२.५१ %,पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top