हॅलो, मी जयंत नारळीकर बोलतोय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नागपूर - 'हॅलो, मी जयंत नारळीकर बोलतो...माझ्या परिचिताला एका महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे याकरिता प्रयत्न करा,’ असे फोन शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक तसेच काही शाळा, महाविद्यालयांच्या संचालकांना येत आहेत. समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याही नावाने काही जणांना फोन आलेत. त्यामुळे सर्वच बुचकाळ्यात पडले असून याची खातरजमा केल्यानंतर कोणीतरी त्यांच्या नावाने फोन करून दबाव टाकत असल्याचे उघडकीस आले आहे. 

दरवर्षी उपसंचालक कार्यालय ते प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे शहरातील नामंवत शाळांमध्ये नर्सरी ते पाचव्या वर्गापर्यतच्या प्रवेशासाठी अर्जाचा ढीग लागतो. कोणी खासदार, मंत्री, आमदार, नगरेवकांचे शिफारस पत्र जोडतो. पुढाऱ्यांचे स्वीय सहायक फोनवरून प्रवेशासाठी दबाव टाकतात. ही बाब तशी अधिकाऱ्यांना नित्याचीच झालेली आहे. मात्र, यावर्षी पुण्यातील शिक्षण संचालकांना एका बहाद्दराने थेट प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर बोलतो, असे सांगून नागपूरच्या एका कनिष्ठ महाविद्यालयात संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देण्यास उपसंचालकांना सांगा, अशी विनंती केली. एवढ्या मोठ्या माणसाचा फोन आल्याने त्यांनीही उपसंचालक सतीश मेंढे यांना निरोप दिला. 

दुसऱ्या दिवशीच मेंढे यांनाही नारळीकर बोलतो असे सांगून प्रवेशासाठी बजावण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याही नावाने त्याच विद्यार्थ्यासाठी फोन आला. यामुळे त्यांची शंका बळावली. त्याच नंबरवर कॉलबॅक केला असता  तो ‘स्विच ऑफ’ होता. उपसंचालकांनी हा प्रकार संचालकांच्या कानावर टाकला. मात्र अद्याप संबंधित फोन बंद असून नारळीकर व आमटे यांच्या नावाने फेक कॉल केला असल्याचे समजते.

शिक्षणमंत्र्यांच्या ‘पीए’चा फोन!
प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनाही अशाच प्रकारे प्रवेशासाठी थेट शिक्षणमंत्र्यांचे पीए असल्याचे सांगून सुर्वे यांच्या नावाने फोन करुन लवकरात लवकर प्रवेश देण्याचा आदेश दिला. याबद्दल त्यांनी सुर्वे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोनच केलाच नसल्याचे सत्य समोर आले.

Web Title: hello jayant narlikar calling college admission