Help for farmers
Help for farmers

पोशिंद्याला द्या बळ! पोळ्याला घ्या लढण्याची शपथ 

अकोला : शेतकरी हा आपला पोशिंदा. तो पिकवतो, मी खातो. तो कष्ट करतो, घाम गाळतो, शेतात राबतो, म्हणून मी सुखाने चार घास पोटात टाकू शकतो. माझ्या ताटात आलेले अन्न त्यानेच पिकवले असते. अशी ही नाळ थेट माझ्या पोटाशी जुळलेली असते. शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे असलेले हे नाते कृतज्ञतेच्या भावनेतून आणखी दृढ करूया. चला, आपल्या गावातील बळीराजाला लढण्याचे बळ देऊया.

'आम्ही तुझ्या सोबत आहोत.' ही शपथ पोळ्याच्या कार्यक्रमात घेऊया. उद्या रविवार म्हणजेच 9 सप्टेंबरला पोळ्याचा दिवस. या दिवशी गावागावात उत्साहाचे वातावरण असते. शेतकरी बैल सजवून गावात एकत्र येतात. नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर स्थियिक झालेली नातेवाईक मंडळी या दिवशी गावात आवर्जून येतात.
शिकायला गेलेले विद्यार्थीही न चुकता गावात जातात. असा हा पोळा अनोख्या मनोमीलनाचा सण. उत्साहाचे जणू उधाण आलेले असते. कधी पावसाने हुलकावणी, कधी कर्जमाफीचे गोंधळ. शेतकरी उत्साहात असला तरी आशेचा किरण अद्याप त्यांच्यापर्यंत अजून पोहचला नाही. काही गावांमध्ये शेतकरी आत्महत्येची कधीतरी दुर्दैवी घटना झालेली असते. या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आत्मबळ देणे हे तुमचे-आमचे सर्वांचे परमकर्तव्य आहे. 'तुमच्या कठीण परिस्थितीत आम्ही तुमच्या सोबत आहोत.' हा विश्वास निदान त्यांना देता येणार नाही काय? प्रयत्न करूया. देऊयात त्याला आत्मबळ. घेऊयात शपथ.

अशी घ्या शपथ? 

गावात जिथे पोळा भरेल, जिथे लोक एकत्र येतील, तिथे पोळा सुटण्यापूर्वी शपथ घ्यायची. गावाचे सरपंच किंवा उपस्थितांमध्ये असलेल्या कुण्या मान्यवराने लोकेच्छेनुसार आधी शपथ वाचायची. सर्वांनी हात पुढे करून ती शपथ म्हणायची, बस्स एवढेच! गावातील कुणीही यासाठी पुढाकार घेऊ शकतात. 'सकाळ'ची ही बातमी दाखवून त्यासाठी सरपंच किंवा पोळ्याच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या गावप्रमुखांना शपथ देण्याची विनंती करावी.

छायाचित्रे पाठवा...

शपथ घेतानाचे सामूहिक छायाचित्र जरूर पाठवा. निवडक छायाचित्रांना 'सकाळ'मधून प्रसिध्दी दिली जाईल. सर्वच छायाचित्रे 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर टाकले जातील. यासाठी व्हॉट्‍सप नंबर : 8087168009 व 9822231652

लाइव्ह करा...
स्मार्ट फोन असलेल्यांनी शपथविधी कार्यक्रमाचे ‘फेसबुक लाइव्ह’ करावे. लाइव्ह केल्यावर ते sakalvarhad ला टॅग करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com