झाडे जगवण्यासाठी रिकाम्या बॉटलची करा मदत; तरुणाईचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

सातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून त्यासाठी संकलन केंद्रही उभारण्यात आले आहेत.
 

संग्रामपूर- सातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून त्यासाठी संकलन केंद्रही उभारण्यात आले आहेत.

तरुणाई फाऊंडेशन व सामाजिक वनीकरण जळगाव जा. परिक्षेत्र यांच्या वतीने सालईबन येथे 17 हजार रोपांची लागवड पावसाळ्यात करण्यात आली आहे. मात्र यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने हि सर्व झाडे जगवण्याचे मोठे आव्हान उभे दिसत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक झाडाच्या मुळाशी बॉटल लावून त्यात पाणी टाकून रोपं जिवंत ठेवण्याचे काम सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खाली बॉटल्सची आवश्यकता आहे. बॉटल कचऱ्यात फेकून न देता या ठिकाणी दिल्या तर अनेक झाडांना जीवदान मिळेल. या साठी सर्वांनी बॉटल संकलनात पुढाकार घेऊन निसर्गाच्या मदतीला सहकार्य करावे, असे आवाहन तरुणाईच्या वतीने नारायण पिठोरे, राजेंद्र कोल्हे, दिनेश ठाकरे यांनी केले आहे.

सोबतच महात्मा फुले संस्था कार्यालय, सुपो कामप्लेक्स बस स्टँड समोर जळगाव जामोद या ठिकाणी सकाळी 10 ते सायं 8 या वेळेमध्ये, 25 नोव्हेंबर पर्यंत संकलन केंद्र सुरू राहणार आहे. या माध्यमातून एक छोटीसी कृती मोठा परिणाम असा सर्वांच्या एकीतून निसर्ग उपयोगी आदर्श निर्माण होऊ शकतो.

Web Title: Help to get empty bottles for save trees Youths appeal