गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने गांजा तस्करी करणारी टोळी आज पकडली आहे. खामगाव येथे एका ऑटोतून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाने औद्योगिक वसाहतीच्या पॉईंटवर सापळा रचला.

खामगाव: उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने गांजा तस्करी करणारी टोळी आज पकडली आहे. खामगाव येथे एका ऑटोतून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाने औद्योगिक वसाहतीच्या पॉईंटवर सापळा रचला.

दरम्यान, गांजा घेवून जाणारा ऑटो पकडण्यात आला असून अंमली वस्तूची तस्करी करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीत 1 महिला व 5 युवक असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक आरोपी फरार झाला आहे. या टोळीकडून 1 ऑटो व 60 किलो गांजा असा एकून अंदाजे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Hemp Smuggling gnag arrested in khamgoan