हेरॉइन, गांजा तस्करांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

नागपूर - गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हेरॉइन व गांजा तस्करांना अटक करून त्यांच्याजवळून ४८ हजारांची हेरॉइन आणि २२ हजारांचा गांजा जप्त केला. अब्दुल बशीर अब्दुल वहाब (४६, रा. किल्ला रोड, महाल) असे हेरॉइन तस्कराचे तर शाहरुख खान ऊर्फ चेचू अब्दुल रऊफ खान असे गांजा तस्कराचे नाव आहे. अब्दुल बशीर हा अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास बशीरच्या घरी धाड घातली. धाडीत त्याच्या घरात ४८ हजारांची १२ ग्रॅम हेरॉइन सापडली. कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अब्दुल बशीरला अटक केली.

उत्तर विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शाहरुख खान ऊर्फ चेचू अब्दुल रऊफखान (१९, एमएलसी कॅंटीनजवळ, मोमिनपुरा) यास अटक करून त्याच्या ताब्यातून २० हजार ३४० रुपयांचा दोन किलो गांजा जप्त केला. हवालदार विनोद मेश्राम, शिपाई नितीन रांगणे, राहुल गुमगावकर, सचिन शेलोकर, महिला शिपाई कुंदा जांभुळकर हे तहसील हद्दीत पॅट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शाहरुख खान ऊर्फ चेचू रस्त्याने जात होता. संशय आल्याने पोलिसांनी त्याला अडवून पिशवीची झडती घेतली असता त्यात दोन किलो गांजा आढळला. पोलिसांनी २० हजारांचा गांजा आणि रोख ३४० रुपये त्याच्याजवळून जप्त केले. तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून शाहरुख खानला अटक केली आहे.

Web Title: Heroin ganja smugglers arrested in nagpur

टॅग्स