कामठीत हेरॉइन जप्त; युवक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कामठी-नागपूर - कामठी रेल्वेस्थानकाजवळील एका पानटपरीजवळ संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी १ लाख ३९ हजारांचे २३.१८० ग्रॅम हेरॉइन जप्त केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कामठीत मादक पदार्थ खुलेआम विकण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोलिस हवालदार विनायक आसटकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, कामठी रेल्वेस्थानकाजवळील एका पानटपरीजवळ एक युवक अमली पदार्थ घेऊन फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपी गुलाम असकारी हैदर अली (२५, रा. मोमीनपारा, रायपूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांनी त्याच्याजवळून २३.१८० ग्रॅम हिरॉइन जप्त केले. ज्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये १ लाख ३९ हजार ०८० रुपये आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ५ हजारांचे दोन मोबाईल असा एकूण १ लाख ४४ हजार ०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

नवीन कामठी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई परिमंडळ क्रमांक ५ चे पोलिस उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक पोलिस आयुक्त राजेश परदेशी, नवीन कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे, पोलिस उपनिरीक्षक अंबादास टोपले, पोलिस शिपाई सूरज भारती, राजू टाकळीकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Web Title: heroin seized crime