अहो साहेब, तो मीच!

अनुप ताले
Thursday, 23 January 2020

सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांचे तारण दागिणे सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, पात्रता यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावांमध्ये चुका दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असून, यादीतील नाव स्वतःचेच असल्याचे पटवून देताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे.

अकोला : सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांचे तारण दागिणे सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, पात्रता यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावांमध्ये चुका दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असून, यादीतील नाव स्वतःचेच असल्याचे पटवून देताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे.

ज्या सावकारांनी त्यांच्या परवाण्यात नमुद नसलेल्या म्हणजेच कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना तारणी व विनातारणी कर्ज दिले होते, त्यांचे कर्ज सुद्धा माफ करण्याचा निर्णय नव्याने झाला होता. त्यानुसार ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना असे कर्ज दिले व त्यांचेपैकी ज्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफीची पात्र यादी तयार करण्यासाठी, तपासणी करण्याचे काम प्रशासनाद्वारे सुरू आहे. जिल्ह्यात या नुसार 139 सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील 36 हजार 540 शेतकऱ्यांना तारणी व विनातारणी कर्जवाटप केले होते. त्यापैकी 8938 शेतकऱ्यांनी गत आठवड्यापर्यंत कर्जाची परतफेड न केल्याचे दिसून आले होते. सध्या कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या काही याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यांचे सावकारांकडील तारण सोडवून त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया राबविली जात असून, नऊ हजाराहून अधिक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणे बाकी असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

शंभर शेतकऱ्यांचे दागिणे सोडली
सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे सावकारांकडेल तारण दागिणे सोडविण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील पात्र 100 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला असून, सावकाराच्या ताब्यातील दागिणे शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्याचे, जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

प्रतिज्ञालेख सादर केल्यास नावात दुरुस्ती
ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत चुकली आहेत, त्यांचेकडून प्रतिज्ञालेख मागविण्यात आले आहेत. प्रतिज्ञालेख प्राप्त झाल्यानंतर यादीतील नाव दुरुस्त करुन संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया पाच दिवसांपासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत 100 शेतकऱ्यांचे तारण सोने सोडविण्यात आले असून, अजूनही हजारो पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणे बाकी आहे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला

अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे
सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत लाभ न मिळाल्याने किंवा पात्र याद्यांमध्ये नावे चुकल्याने तसेच प्रत्यत्र लाब मिळण्यासाठीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी शेतकरी तालुका उपनिबंधक कार्यालयात भेट देत आहेत. परंतु, याठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसून, सराफाकडे जाऊन तुमची नावे तुम्ही दुरुस्त करा, त्यांचेकडून लेखी आणा, अशा प्रकारची टाळाटाळ होत असल्याचे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले. शिवाय अधिकाऱ्यांनी सहकार्य करुन योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांचेकडून करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hey sir, that name is mine