खासदार नवनीत राणांना उच्च न्यायालयाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने सोमवारी त्यांना नोटीस बजावली आहे.

नागपूर - अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने सोमवारी त्यांना नोटीस बजावली आहे. 

माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनुसार अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. पण, नवनीत राणा या ‘लुहाणा’ जातीच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे. असे असतानाही बनावट दस्तऐवजाच्या आधारावर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही मतदारांची फसवणूक असून त्यांची निवड अवैध आहे. त्यांची निवड रद्द ठरवण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. राघव कविमंडन यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Court notice to MP Navneet Rana