विदर्भातील 50 हजारावर कृषिपंपांना उच्चदाब वीजपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

८०४ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेतून विदर्भातील तब्बल ५० हजार ३६५ कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीजजोडणी दिली जाणार आहे. 

अकोला - शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची ऑनलाईन निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ८०४ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेतून विदर्भातील तब्बल ५० हजार ३६५ कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीजजोडणी दिली जाणार आहे. 

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या अकरा जिल्ह्यांमध्ये सुमारे ८०४ कोटी रुपये मूल्याच्या विविध कामांच्या २३१ निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. योजनेंतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर सर्व्हेक्षण झाले आणि त्यातून योजना तयार करण्यात आली. या योजनेत नागपूर परिक्षेत्रात ३१ मार्च २०१७ आणि ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाऱ्या ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. 

जिल्हानिहाय मंजूर निधी - 

अकोलाः  132 कोटी 45 लाख

बुलडाणाः 127 कोटी 16 लाख

वाशीम: 99 कोटी 5 लाख

अमरावती: 87 कोटी

यवतमाळः 107 कोटी 87 लाख

नागपूरः 58 कोटी 78 लाख

चंद्रपूरः 55 कोटी 22 लाख

भंडाराः 49 कोटी 22 लाख

वर्धाः 35 कोटी 76 लाख

गोंदियाः 32 कोटी 54 लाख 

गडचिरोलीः 14 कोटी 70 लाख 

उच्चदाब वितरण तंत्र -
या तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होल्टेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मर्यादित ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. शेतकऱ्यांना थेट वितएरण रोहित्रावरून वीज दिली जाणार असल्याने वीज हानी रोखण्यास मदत मिळणार असून, कृषिपंपांनाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा मंडलनिहाय तपशिल -

जिल्हा निविदा संख्या निविदा मूल्य (कोटीत) कृषिपंप ऊर्जीकरणाचे ध्येय
अकोला 29 127.16 6349
बुलडाणा                                        39 137 7699
वाशीम                                        25 99.05 7159
अमरावती                               23 87.26   5309
यवतमाळ                         30 107.87 7407
नागपूर                                       20 58.78 2842
वर्धा                                         13 35.76 2624
भंडारा                                       15 49.22 3591
गोंदिया                                      12 32.54 2362
चंद्रपूर                                     19 55.22 3940
गडचिरोली                                       6 14.70 1083
एकूण                                     228 804.62 50365

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: High power supply to 50 thousand agriculture pipes in Vidarbha