"समृद्धी'ला समांतर "हायस्पीड रेल्वे' मार्ग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

नागपूर - नागपूर-मुंबई या "समृद्धी' मार्गाला समांतर असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केली. त्यामुळे आता नागपूर-मुंबई प्रवासात प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी समृद्धी मार्गाला समांतर रेल्वेसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी असेल तर आजच यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे याच कार्यक्रमात सांगितले होते. 

नागपूर - नागपूर-मुंबई या "समृद्धी' मार्गाला समांतर असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केली. त्यामुळे आता नागपूर-मुंबई प्रवासात प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी समृद्धी मार्गाला समांतर रेल्वेसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी असेल तर आजच यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे याच कार्यक्रमात सांगितले होते. 

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात महापालिका, महावितरणच्या विविध कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते पार पडले. याशिवाय महामेट्रो, रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार यांच्यात तसेच वेकोलि व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार समारंभ पार पडला. या समारंभात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी मुख्य अतिथी म्हणून तर केंद्रीय रेल्वे व कोळसामंत्री पीयूष गोयल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह सर्व आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, रेल्वे, महामेट्रो, महावितरण, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी प्रकल्पाला लागून हायस्पीड रेल्वेची राज्य सरकारची इच्छा होती. परंतु, निधीमुळे हात आखडता घेतला होता, असे सांगितले. मात्र, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वतःच भाषणातून प्रस्ताव पुढे केल्याने या प्रकल्पासाठी राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले, वेकोलिच्या पाच खाणीतून पाइप कन्व्हेयरद्वारे थेट औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरविण्यात येणार असल्याने प्रदूषणात घट होईलच, शिवाय वीजनिर्मितीसाठी चांगला कोळसा निर्माण होणार असून खर्चातही घट होऊन नागरिकांना कमी दरात वीज मिळेल. भांडेवाडी येथे कचऱ्यातून वीजनिर्मितीमुळे दीड वर्षात येथील नागरिक दुर्गंधीमुक्त होतील, असेही ते म्हणाले. नागपुरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर प्रकल्प आर्थिक उत्पन्नाचा उत्तम मॉडेल असून शुद्ध पाण्याची बचतही होईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर वीज प्रकल्प कन्व्हेयर बेल्टने जोडण्यात येत असल्याचे सांगितले. उमरेड येथे होऊ घातलेल्या वीज प्रकल्पाला वेकोलिचे पाणी मिळणार असल्याचेही ते म्हणाले. 

भूमिपूजन व विविध करार 
- ब्रॉडगेज मेट्रो रेल्वेसाठी महामेट्रो-भारतीय रेल्वे-राज्य सरकारमध्ये करार 
- वेकोलि व विदर्भ पाटबंधारे विकास मंडळात वेकोलिचे पाणी शेतींना देण्यासंबंधी करार 
- पाच कोळसा खाणींतून पाइप कन्व्हेयरद्वारे कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांना कोळसा पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन 
- भानेगाव कोळसा खाणीतील पाणी खापरखेडा वीज केंद्राला पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन 
- भांडेवाडी येथे कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन 
- प्रक्रिया केलेले सांडपाणी खापरखेडा व कोराडी वीज केंद्राला देण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन 

Web Title: High Speed Rail route parallel to Samrudhi higway