विदर्भात अकोला सर्वांत "हॉट' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

अमरावती - सूर्य पृथ्वीच्या मध्यभागी (विषुववृत्तावर) येत असल्याने तापमानात वाढ होत आहे. विदर्भ, पूर्व- पश्‍चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या तुलनेत अकोला येथे आज, बुधवारी सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. 

विदर्भात तापमानात वर्धा जिल्हा दुसऱ्या (43.8 अंश सेल्सिअस) व नागपूर जिल्हा (43 अंश सेल्सिअस) तिसऱ्या स्थानी राहिला. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेले तापमान जिल्हानिहाय चंद्रपूर 42.8, ब्रह्मपुरी 42.5, गोंदिया व अमरावती प्रत्येकी 42.2, यवतमाळ 42, बुलडाणा 41 तसेच वाशीम येथील तापमान 39.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. 22 मार्चला दिवस व रात्र समसमान असते. त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजेच 23 मार्चपासून दिवस वाढण्यास सुरुवात झाली. त्यासोबतच तापमानात वाढ झाली. मार्च महिना संपण्यापूर्वीच तापमान वाढलेले आहे. कडक उन्हाळ्याचा एप्रिल व त्यापेक्षाही कडक मे अद्याप येण्यास बराच अवधी असताना पारा चढलेला आहे. उन्हाळ्याची सुरुवातच कडक झालेली आहे. त्यामुळे खरा उन्हाळा कसा असेल, याबाबत आतापासूनच चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 

Web Title: high temperature in akola