चंद्रपूरवर सुर्य कोपला 

चंद्रपूरवर सुर्य कोपला 

नागपूर -  नागपूरच्या पाऱ्याने मंगळवारी अचानक विक्रमी उसळी घेतल्यांनतर काल तापमानाचा शतकातील विक्रम मोडीत निघणार काय, याविषयी नागपूरकरांमध्ये उत्सुकता होती. परंतु, सूर्यनारायणाने थोडी उसंत दिल्याने विक्रम अबाधित राहिला. चंद्रपूरवासींवर मात्र बुधवारी सुर्य चांगलाच कोपला. कमाल तापमानाने येथे यंदाच्या उन्हाळ्यातील 48 अंशांचा नवा उच्चांक गाठला. 

उन्हाच्या लाटेचा प्रभाव विदर्भात बुधवारीही प्रकर्षाने जाणवला. मंगळवारी गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक 47.5 अंशांचा उच्चांक गाठल्यानंतर नागपूरच्या तापमानात आज दीड अंशाची अनपेक्षित घसरण होऊन पारा 46 अंशांवर आला. सूर्यनारायणाने मेहरबानी केल्यामुळे 23 मे 2013 रोजी नोंदला गेलेला 47.9 अंशांचा विक्रम मोडीत निघू शकला नाही. कालच्या तुलनेत नागपुरात आज उन्हाचे चटके थोडे कमीच जाणवले. नागपूरची कसर चंद्रपूर शहराने भरून काढली. येथे पारा चक्‍क 48 अंशांवर पोहोचला. देशात सर्वाधिक तापमानाची नोंद येथेच झाली. याशिवाय जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये चंद्रपूर चौथ्या स्थानावर राहिले. विदर्भातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम चंद्रपूरच्या नावावरच आहे. जून 2007 मध्ये येथे कमाल तापमान 49 अंशांवर गेले होते. त्यामुळे गुरुवारी हा विक्रम मोडीत निघणार काय, याबद्दल चंद्रपूरवासींमध्ये निश्‍चितच उत्सुकता राहणार आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी (47.5 अंश सेल्सिअस), वर्धा (46.9 अंश सेल्सिअस), अमरावती (46.4 अंश सेल्सिअस), अकोला (45.7 अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (45.5 अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे चटके जाणवले. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी शहर जगात पहिल्या पाचमध्ये राहिले. 

केप सेंट फ्रान्सिस @ 56.8  
बुधवारचा दिवस दक्षिण आफ्रिकेच्या केप सेंट फ्रान्सिस शहरातील नागरिकांसाठी सर्वांत त्रासदायक ठरला. येथे कमाल तापमानाने थेट पन्नाशी पार करीत 56.8 अंशांवर उडी घेतली. तशी नोंद जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या "एल डोराडो' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com