ब्रह्मपुरी विदर्भात हॉट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेचा प्रभाव रविवारीही कायम राहिला. ब्रह्मपुरी येथे विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरचा पारा "जैसे थे' राहिला. 

नवतपा जसजसा जवळ येत आहे, तसतसा उन्हाचा तडाखा वाढत आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या चंद्रपूर येथे पाऱ्यात किंचित घट झाली. येथे कमाल तापमान 47.4 अंश नोंदले गेले. ब्रह्मपुरी येथे पाऱ्याने विदर्भातील 47.6 अंशांचा विक्रम नोंदविला. नागपुरात (46.2 अंश सेल्सिअस) कमाल तापमान कालच्या इतकेच नोंदले गेले. या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: high temperature recorded in Vidarbha at Brahmapuri