चंद्रपूर देशात सर्वाधिक "हॉट' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नागपूर - विदर्भात उन्हाची लाट कायम असून, चंद्रपुरात बुधवारी देशातील सर्वाधिक 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात उष्णलाटेचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य भारतातील विदर्भ, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये उन्हाची तीव्र लाट सुरू आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव चंद्रपूर, अकोला आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये जाणवला. मंगळवारी राज्य व देशात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या चंद्रपुरात पारा आणखी एका अंशाने चढून 45.4 अंशांवर स्थिरावला. येथे बुधवारीही भारतात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल 44 अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदले केले. नागपुरातही पारा 43.2 अंशांवर कायम राहिला. विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऱ्याने चाळिशी पार केली असून, या आठवड्यात उन्हाचा भडका आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: highest temperature in Chandrapur