Election Results 2019 : हिंगणा मतदारसंघ : भाजपचे समीर मेघे आघाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसने या वेळी भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांना भाजपचे समीर मेघे यांच्याविरोधात मैदानात उतरविले आहे. घोडमारे त्यांचे तिकीट कापल्याचा बदला घेण्यासाठी घोडमारे यांनी तयारी केली होती.

नागपूर : संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागून असलेल्या हिंगणा मतदारसंघातून भाजपचे विद्यमाने आमदार समीर मेघे यांना 2415 मतांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार विजय घोडमारे 3378 मते मिळाली असून, मेघे यांना नऊशेवर मतांची आघाडी आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने या वेळी भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांना भाजपचे समीर मेघे यांच्याविरोधात मैदानात उतरविले आहे. घोडमारे त्यांचे तिकीट कापल्याचा बदला घेण्यासाठी घोडमारे यांनी तयारी केली होती. आक्रमक, आकर्षक प्रचारात समीर मेघे यांनी तूर्तास बाजी मारली. हिंगणा मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे नेते रमेशचंद्र बंग यांनी पुढाकार घेत विजय घोडमारे यांचा पक्षप्रवेश व उमेदवारी निश्‍चित करण्यात मोठी भूमिका बजावली होती. घोडमारे यांच्या प्रचाराचे सूत्रधारही बंग हेच आहेत. सहकार क्षेत्रातील दिग्गज असलेले बंग यांचे वर्चस्व मोडण्यासाठी समीर मेघे यांनी कंबर कसली आहे. ही लढत बंग व घोडमारे यांचे भविष्य ठरविणारी आहे. तर, समीर मेघे यांना राजकारणात स्थिरावणारी ही निवडणूक ठरणार आहे. मतदारसंघातील अनुसूचित जातीची मतेही निर्णायक ठरणार आहेत. वंचितचे उमेदवार नितेश जंगले यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingana constituency: Sameer Meghe of BJP leads