दर गडगडल्याने मनावर दगड ठेवून टरबुजाच्या पिकात सोडली जनावरे

water melon
water melon

यवतमाळ : नैसर्गिक संकटात सापडलेले जिल्ह्यातील शेतकरी यंदा कोरोनामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. यंदाचा टरबूज हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. टरबुजाची मागणी घटल्याने जिल्ह्यातील तब्बल एक हजार 100 एकर शेतावरील पीक मातीमोल झाले आहे. 

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. हा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण वाहतूक बंद झाली आहे. त्याचा परिणाम शेती व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी फळउत्पादक शेतकरी मात्र, अडचणीत सापडले आहेत. उन्हाळ्यात टरबुजाची मागणी प्रचंड असते. त्यामुळे शेतकरी फळपीक घेतात. गेल्या वर्षी जिल्ह्यात एक हजार तीनशे एकर शेतावर टरबूज पिकाची लागवड करण्यात आली होती.

यवतमाळ जिल्ह्यात ठोक दर आले दोन रुपये प्रतिकिलोवर 
टरबुजाचे दर प्रतिकिलो आठ ते 12 रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे यंदा पेरणीक्षेत्र तब्बल तीनशे एकरांनी वाढले. यंदा सोळाशे एकर शेतावर टरबूज पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा उत्पादन व फळही चांगले होते. परंतु, कोरोनामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे. संचारबंदीमूळे बाहेरचे व्यापारी आले नाहीत. ग्राहकांनीही सध्या टरबूजकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. सध्या ठोक दर केवळ दोन रुपये प्रतिकिलो असून, फळ घेण्यासाठी कोणी तयार नाहीत. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

चार टन फळ जनावरांना 
दारव्हा तालुक्‍यातील सावळी येथील शेतकरी संतोष ठाकरे यांनी दीड एकर शेतात टरबुजाची लागवड केली. यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. या पिकातून चार लाखांचे उत्पन्न होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, कोरोनामुळे बाजारपेठे ठप्प झाली आहे. ठाकरे यांनी आतापर्यंत जवळपास सात टन माल काढला आहे. त्यातील तीन टन माल गाव व लगतच्या गावांत विकला. उर्वरित जवळपास चार टन फळ जनावरांना, तर कधी फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com