जिल्हा परिषद समुहनिवासी प्राथमिक शाळा इमारत छताला गळती

मनोहर बोरकर
गुरुवार, 12 जुलै 2018

एटापल्ली (गडचिरोली) : येथील जिल्हा परिषद समुहनिवासी प्राथमिक शाळेच्या इमारती मधील सर्वच खोल्यांचे छताला गळती लागली असून विद्यार्थ्यांना विद्यार्जन करण्यास त्रास सहन करावा लागत असल्याने इमारत छताची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हापरिषद सदस्य संजय चरडुके, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी केली आहे.

सदर शाळेत पहिली ते चौथी पर्यंत १८१ विद्यार्थी शिक्षण घेत असून एकूण ९ खोल्यांत वर्ग भरविले जातात मात्र पावसाच्या दिवसात सर्वच्या सर्वच नऊही खोल्यांच्या छताला गळती लागत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन विद्यार्जन करावे लागत आहे.

मुख्याध्यापक शेषराव संगिडवार यांनी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे इमारत दुरुस्ती करीता मागणी करूनही प्रशासनकडून कोणतीही दाखल घेण्यात आली नसल्याचे सांगितले.

Web Title: holes to roof of zilha parishad school