भूतेश्वरनगरात वीजबिलाची होळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : युवक कॉंग्रेसतर्फे एसएनडीएलच्या विरोधामध्ये जनजागृती अभियान राबविले जात आहे. याद्वारे, आज प्रभाग क्रमांक 18 भूतेश्वरनगरमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यात आला. संतप्त नागरिकांनी भूतेश्‍वरनगर चौकात एसएनडीएलच्या वीजबिलांची होळी केली. शेवटपर्यंत एसएनडीएलविरोधात लढत राहू, असे आश्‍वासन युवक कॉंग्रेसतर्फे नागरिकांना देण्यात आले.

आंदोलनकर्ते म्हणाले, या परिसरातील नव्वद टक्के कुटुंब अतिसामान्य वर्गातील आहेत. त्यांचे मासिक वेतन 7 हजारांच्या जवळपास असून त्यांना 2 ते 4 हजार रुपयांपर्यंत वीजबिल येते. अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने अंधारात राहण्याची वेळ भूतेश्‍वरनगरवासीयांसमोर आली आहे. या परिसरातील चौधरी पती-पत्नी दोघेही अपंग आहेत. महिन्याला सहा हजार रुपये ते कमावतात. मात्र, त्यांना चार हजार रुपये वीजबिल आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शहर महासचिव रोशन पंचबुधे, मध्य नागपूर महासचिव अमन लुटे, राष्ट्रीय सचिव नगरसेवक बंटी शेळके, शहराध्यक्ष तौसीफ खान, मध्य नागपूर अध्यक्ष स्वप्नील ढोके, महासचिव रोशन पंचबुधे, उपाध्यक्ष आकाश गुजर, आकाश चौरिया, प्रदेश सचिव फजलुर कुरेशी, पश्‍चिम नागपूर अध्यक्ष अखिलेश राजन, पूर्व नागपूर अध्यक्ष अक्षय घाटोले, महासचिव विलास पुणेकर, महासचिव अजहर शेख उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holi of electricity bill in Bhuteswarnagar