पावसामुळे झोपडी उध्वस्त, वृध्द दाम्पत्य रस्त्यावर

संदीप रायपुरे
मंगळवार, 10 जुलै 2018

गोंडपिपरी (चंद्रपूर) : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्याची झळ सामान्यांना बसत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी चंद्रमोळी झोपडीत संसाराचा गाडा हाकणाऱ्या एका आतिशय गरीब वयोवृध्द दाम्पत्यांची झोपडी कोसळली. अन् क्षणातच संसार रस्त्यावर आला. भर पावसात उघड्यावर आलेल्या दाम्पत्यांना मदत करण्याचे औदार्य कुणीच दाखविले नाही. तहसिलदार मेटकरी यांनी तर असंवेदनशिलतेचा कळस गाठला.

पाऊस कमी झाल्याने प्रशासनाकडून मदत मिळणे शक्य नसल्याचे सांगितले. अन् सोबतच हतबल व्यवस्थेचा परिचय दिला. परिस्थीतीने हतबल व लाचार झालेल्या गरीब वयोवृध्द दाम्पत्याला जनावरांसोबत गोठ्यात दिवस काढण्याची पाळी आली. गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात सर्वदूर पाऊस सूरू आहे. गोंडपिपरी तालूक्यातही सतत पाऊस सूरू आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सालेझरी गावात नानाजी ठुसे हे आपली पत्नी दुमनबाई सोबत एका झोपडीत ससाराचा रहाटगाडग हाकीत होती. पैपै जमा करून दोन मुलीचे हात पिवळे केल्यानंतर आयुष्याची संध्यकाळ समाधानाने जगण्यासाठी हे वृध्द दाम्पत्य धडपडत होते.

दोन जनावरांचा एक लहानसा गोठा अन अगदी त्याच आकाराची झोपडी अशा अतिशय सामान्य स्थितीत दिवस काढताना तीन दिवसाच्या पावसाने त्यांचे जीवनच बदलविले.

संततधार पावसामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांची झोपडी पुर्णतः कोसळली, अन् भर पावसात संसार उघड्यावर आला. या दाम्पत्याला मदतीचा हात देण्याचे औदार्य कुणीच दाखविले नाही. तहसिलदार सोनाली मेटकरी यांना सदर घटनेची माहिती दिली व प्रशासनाकडून काही मदत करावी अशी स्वाभाविक अपेक्षा व्यक्त केली. पण मदत करता येणार नाही असं तहसिलदार मेटकरींनी दिलेल कारणच असंवेदनशिलतेचा कळस गाठणार ठरल.

पाऊस जास्त न झाल्याने वयोवृध्दांना मदत करता येणार नाही असे सांगत तहसिलदार मेटकरी यांनी आपले हात वर केले. आपत्ती व्यवस्थापनात सदैव तत्पर असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाची या घटनेने पुरती पोल खुलली आहे.

अशावेळी परिस्थीतीने हतबल व लाचार ठरलेल्या वयोवृध्द दाम्पत्याला आयुष्याच्या संध्याकाळी जनावरासोबतच दिवस काढावे लागत आहेत.

Web Title: home destroy due to heavy rain old age couple on road