गृह फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी 98 हजार परस्पर हडपले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

अमरावती : महिंद्रा ग्रामीण (गृह) फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून वसूल केलेली कर्जाची रक्कम कंपनीत जमा न करता स्वत:च हडपली. प्रकरणी दोघांविरुद्ध मोर्शी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अमरावती : महिंद्रा ग्रामीण (गृह) फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून वसूल केलेली कर्जाची रक्कम कंपनीत जमा न करता स्वत:च हडपली. प्रकरणी दोघांविरुद्ध मोर्शी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
शौकत खान नियामत खान (रा. फरीद कॉलनी, मोर्शी) व मुकेश जोगिराज पंडागळे (रा. येरला) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. महिंद्रा रुलर फायनान्स शाखा मोर्शी हद्दीत ग्रामीण भागात अनेकांनी कंपनीकडून गृहकर्ज घेतले. त्यापैकी बऱ्याच जणांनी टप्प्याटप्प्याने त्याची परतफेड सुरू केली. कर्जवसुलीसाठी नमूद दोघांची नेमणूक होती. त्यांनी ग्राहकांकडून 27 जून ते 19 जुलै 2019 या कालावधीत जवळपास 98 हजार 280 रुपये वसूल केले. ग्राहकांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांना कंपनीच्या नावाच्या बनावट पावत्यासुद्धा दिल्या. कंपनीने नमूद दोघांकडे पैसे भरण्यासाठी मुदतसुद्धा दिली होती. परंतु त्यांनी पैशासाठी नकार दिला. मोर्शी रुलर शाखेतील दीपक गणपत नंदनकर (रा. गुरुकृपा कॉलनी, मोर्शी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शौकतखान व मुकेश यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारपर्यंत (ता. पाच) यात कुणालाही अटक झाली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Finance employees strike 98,000 mutually

टॅग्स