पतीची नसबंदी अन् पत्नी गर्भवती...

अनिल कांबळे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नागपूरः मनपामध्ये कर्मचारी असलेल्या घरमालकाने 25 वर्षीय भाडेकरू महिलेवर बलात्कार केला व पुढे कर्ज चुकविण्यासाठी मित्रांना बोलावून महिलेला बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहली. मात्र, पीडित महिलेच्या पतीने दोन वर्षांपूर्वीच नसबंदी केली आहे. पतीची नसबंदी अन् पत्नी गर्भवती राहिल्यामुळे अत्याचाराची घटना समोर आली आहे.

नागपूरः मनपामध्ये कर्मचारी असलेल्या घरमालकाने 25 वर्षीय भाडेकरू महिलेवर बलात्कार केला व पुढे कर्ज चुकविण्यासाठी मित्रांना बोलावून महिलेला बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहली. मात्र, पीडित महिलेच्या पतीने दोन वर्षांपूर्वीच नसबंदी केली आहे. पतीची नसबंदी अन् पत्नी गर्भवती राहिल्यामुळे अत्याचाराची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून घरमालक व त्याच्या मैत्रीणीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. माणिक रामचंद्र नेवारे (वय 53, रा. लष्करीबाग) आणि आशा भूषण शर्मा (वय 50, रा. पिवळी नदी, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित 25 वर्षीय महिला रिना (बदललेले नाव) ही पती व दोन मुलांसह जरीपटक्‍यातील पिवळी नदी परिसरात भाड्याच्या घरात राहते. ते दाम्पत्य मूळचे मध्यप्रदेशातील बालाघाटचे आहे. पती मिळेल ते काम करून घरखर्च भागवतो. घरमालक माणिक नेवारे हा महापालिकेत कार्यरत आहे. त्याची महिलेवर सुरूवातीपासूनच वाईट नजर होती. मे 2018 मध्ये घरभाडे मागण्यास माणिक तिच्या रूमवर आला. त्याने ताबडतोड घराचे भाडे मागितला. मात्र, रिनाने पैशाची अडचण असल्याचे सांगून महिनाभर थांबण्यास सांगितले. मात्र, तिची असहायता ओळखून त्याने घर खाली करण्यास सांगितले. तिने विनंती केली असता त्याने घरात ओढून तिच्याशी अश्‍लिल चाळे केले. आरडाओरड केल्यास घराबाहेर काढण्याची धमकी दिली. जून महिन्यात घर भाडे मागण्यासाठी आल्यानंतर थेट शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. तिला घरात ओढून बळजबरी तिच्यावर बलात्कार केला. अशाप्रकारे तो घर भाडे दिल्यानंतरही धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.

असहायतेचा घेतला फायदा
रिनाचा पती आजारी पडला. हॉस्पिटलमध्ये जवळपास 25 हजार रूपये बील आल्यानंतर रिनाने आरोपी माणिक नेवारेला 25 हजाराचे कर्ज मागितले. कर्ज फिटेपर्यंत वाटेल तेव्हा शारीरिक संबंध ठेवण्याची त्याने अट घातली. पतीच्या आजारामुळे हतबल असलेल्या रिनाने होकार दिला. तेव्हापासून तो तिला वेगवेगळ्या ठिकाणावर नेऊन लैंगिक शोषण करीत होता.

देहव्यापारात प्रवेश
25 हजार रूपयाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नेवारने रिनाची शेजारी राहणारी मैत्रीण आशा भूषण शर्मा हिची भेट घालून दिली. आशाने तिला आंबटशौकीन ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवल्यास तासाभराचे 500 रूपये अशी मजूरी ठरविली. पटकन कर्ज फेडण्याचे देहव्यापारात ओढले. आशाच्या घरात तिच्याकडून देहव्यापार करवून घेतला तर सीताबर्डीतील काही लॉजवरही तिला ग्राहकांसोबत पाठविण्यात आले.

पतीची नसबंदी पण पत्नी गर्भवती
रिना ही पाच महिन्यांची गर्भवती आहे. मात्र, तिच्या पतीने गेल्या दोन वर्षांपूर्वीच नसबंदीचे ऑपरेशन केले आहे. रिनाने पतीला सर्व हकीकत सांगितल्यानंतर माणिक आणि आशाचे पाप उघडकीस आले. जरीपटका पोलिसांनी माणिकला अटक केली तर आशा फरार झाली.

Web Title: home owner rape women at nagpur