घरातूनच करा कचरा विलगीकरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नागपूर - कचरा फेकण्यापूर्वी त्याचे घरातच विलगीकरण केल्यास पर्यावरणात घातक वायू निर्माण होणार नाहीत. विविध कचरा एकत्र फेकल्यास कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्यांनाच नव्हे, तर नागरिकांनाही धोका असतो. त्यामुळे ई-कचरा हा घरांमधूनच वेगळा व्हावा, असे मत महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. 

मैत्री परिवार संस्थेतर्फे नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीच्या सहकार्याने "ई-कचरामुक्त नागपूर'साठी ई-कचरा संकल्प अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, ग्रामीण पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, रा. स्व. संघ लोककल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, महानगर सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, पर्सिस्टंट सिस्टिमचे अधिकारी समीर बेंद्रे, मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, मकरंद पांढरीपांडे उपस्थित होते. 

आयुक्त म्हणाले की, मध्यमवर्गीय मानसिकता आजही ई-कचऱ्याला कचरा म्हणून संबोधत नाही. मात्र, घराबाहेर मात्र तो कचरा म्हणूनच टाकतात. पर्यावरणाच्या दृष्टीने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट होणे आवश्‍यक आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी वैयक्‍तिक उदाहरण देत ई-कचऱ्याचे संकलन आणि त्याचे व्यवस्थापन हे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. शिवाय त्याचे विलगीकरण करण्याची जबाबदारी नागरिकांचीच आहे. या उपक्रमात सर्वप्रथम पोलिस विभागातील ई-कचरा संकलित करण्यात येईल. डॉ. दिलीप गुप्ता, श्रीधरराव गाडगे, शैलेश बलकवडे, समीर बेंद्रे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे यांनी केले. मकरंद पांढरीपांडे यांनी ई-कचऱ्याचे स्वरूप स्पष्ट केले. माधुरी यावलकर यांनी संचालन केले.

Web Title: Home trash isolated