डॉक्‍टरचे समलैंगिक कृत्य कॅमेऱ्यात कैद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

शहरातील एका डॉक्‍टर पतीचे स्वत:च्याच रुग्णालयात सुरू असलेले समलैंगिक संबंध पत्नीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले. त्यामुळे पतीने आपला विश्‍वासघात केल्याचा आरोप डॉक्‍टर पत्नीने केला. प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन सायबर पोलिसांनी डॉक्‍टरला अटक केली असून न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमरावती ः शहरातील एका डॉक्‍टर पतीचे स्वत:च्याच रुग्णालयात सुरू असलेले समलैंगिक संबंध पत्नीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले. त्यामुळे पतीने आपला विश्‍वासघात केल्याचा आरोप डॉक्‍टर पत्नीने केला. प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन सायबर पोलिसांनी डॉक्‍टरला अटक केली असून न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पती-पत्नी व्यवसायाने डॉक्‍टर आणि पर्यायाने एकाच शाखेत दोघांचेही ज्ञान असल्याने त्यांनी शहरात स्वतंत्र खासगी रुग्णालये थाटली. अंदाजे अठरा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांना दोन अपत्ये झाली. बारा-तेरा वर्षे सर्वकाही सुरळीत होते; परंतु पाच वर्षांपासून त्यांच्या सुखी संसारात अचानक बदल झाला. या बदलाचे कारण पती-पत्नींमधील कौटुंबिक वाद नव्हताच. डॉक्‍टर पती हा पत्नीपासून दुरावा ठेवत होता. पतीमध्ये अचानक झालेल्या बदलाकडे प्रारंभी पत्नीने दुर्लक्ष केले; परंतु पतीच्या वागणुकीत कमालीचा बदल घडत गेला. ही बाब त्याच्या उच्चविद्याविभूषित पत्नीला समजायला वेळ लागला नाही. पत्नीला दूर ठेवण्यासाठी डॉक्‍टर पती तिच्यासोबत वारंवार भांडण करायचा. एकदा भांडण झाले की, या डॉक्‍टर दाम्पत्यांत बरेच दिवस अबोला राहायचा. एक दिवस, अचानक टोकाची भूमिका न घेता या बदलाची सत्यता पडताळून पाहण्याचे पत्नीने ठरविले. पतीच्या रुग्णालयात तिने एक खुफिया कॅमेरा बसविला. ही बाब तिने पतीला माहीत होऊ दिली नाही. काही दिवसांनी तिने त्या खुफिया कॅमेऱ्याचे चित्रीकरण बघितले, तेव्हा त्यातून धक्कादायक वास्तव बाहेर आले. हा प्रकार डॉक्‍टर असलेल्या पत्नीला मनस्ताप देणारा ठरला. यासंदर्भात कुणाकडेच ती बोलू शकत नव्हती. अखेर दोघांमधील संबंध दुरावत असल्याचे बघून त्यांनी घटस्फोटासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू केले. या प्रकाराची तक्रार तिने शहर कोतवाली ठाण्यात नोंदवली. एप्रिलच्याच पहिल्या आठवड्यात पत्नीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी डॉक्‍टर पतीविरुद्ध विश्‍वासघात, शारीरिक, मानसिक त्रास आणि समलैंगिकतेसंदर्भात गुन्हा दाखल केला. तपासासाठी हे प्रकरण सायबर शाखा पोलिसांकडे आले, तेव्हा पोलिसांनी डॉक्‍टर पतीला शनिवारी (ता. सात) सायंकाळी अटक केली. अटकेला दुजोरा सायबर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांनी केली.
पोलिसांची गोपनीयता
गुन्हा दाखल होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला; परंतु प्रकरण डॉक्‍टर दाम्पत्याचे व हाय प्रोफाईल असल्याने कोतवाली व सायबर पोलिसांनी तपासासंदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली.

Web Title: Homo doctor caught in camera by his wife