
अमरावतीतील चिखलदरा येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळ चारचाकी खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात मृताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतक व जखमी आंध्रप्रदेश येथील असल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कार अनियंत्रित झाल्यामुळे ती100 फुटापेक्षा जास्त खोली असलेल्या दरीत कोसळली आहे.
कोकणात जाताना गणेश भक्तांच्या एसटीला अपघात
मुंबई-गोवा महामार्गावरती एस.टी .बस आणि कंटेनर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. एस.टी बसने कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. माणगाव जवळ असणाऱ्या रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
या भीषण अपघातात एस.टी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर, 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.