हत्या प्रकरणात परिचर, सफाई कामगार दोषी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांकडूनच मनोरुग्णांचा गळा आवळून खून होत असल्याच्या घटना येथे घडल्या. मात्र या प्रकरणात डॉक्‍टर परिचारिकांना सोडून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवत त्यांनाच कायद्याने दोषी ठरवण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी एक कक्ष परिचर आणि एका सफाई कामगार महिलेस दोषी ठरविले.  

प्रादेशिक मनोरुग्णालयात गतवर्षी २३ मृत्यू झाले. यापैकी अवघ्या निवडक शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. यात अज्ञात अशा सायको किलरकडून गळा आवळून दोन खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले. जयंत रत्नाकर नेरकर (वय ४५, रा. झिंगाबाई टाकळी, गोधनी) हा मनोरुग्ण मनोरुग्णालयात भरती असताना १८ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे साडेतीन वाजता त्याचा मनोरुग्णालयात मृतदेह आढळला होता. शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालावरून नेरकर यांचा गळा आवळून खून झाल्याचे पुढे आले. 

यानंतर मालती पाठक (७०) ही महिला मनोरुग्ण मनोरुग्णालयाच्या वॉर्ड क्र. २० भरती होती. ६ ऑक्‍टोबर २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु शवविच्छेदनातून पाठक यांचा मृत्यू नसून गळा आवळून खून केल्याचे पुढे आले. चौकशी समिती स्थापन केली. दरम्यान, मानकापूर पोलिसांकडे हे प्रकरण आले. त्यांनी चौकशी केली. यात डॉक्‍टर, कक्ष परिचर, परिचारिका यांची साक्ष नोंदवून घेतली. मात्र दोष कक्ष परिचर आणि सफाई कामगार महिलेवर ठेवण्यात आला. 

सुरक्षेची जबाबदारी कोणाची?  
डॉक्‍टरांचे काम उचार करणे आहे. परिचारिकांचे काम रुग्णसेवा देणे आहे. कक्ष परिचराचे काम त्याला केवळ हातभार लावणे तर सफाई कामगारांनी वॉर्डातील स्वच्छता करणे हेच काम आहे. यामुळे मनोरुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर कोणत्या आधारे देण्यात आली. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष भडकला असून बुधवारी तासभर कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर ठाण मांडले होते.

Web Title: hospital murder case cleaning worker crime