रॅगिंग रोखण्यासाठी रुग्णालयात पथक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

नागपूर : राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून होणारी रॅगिंग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न राज्याकडून करण्यात येणार आहेत. भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) अभ्यासक्रमात बदल केला. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमातील
"एमबीबीएस'चे विद्यार्थी रुग्णसेवेसह विविध कामे करताना दिसतील. तसेच महाविद्यालयात होणारी रॅगिंग रोखण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णयावर गुरुवारी शिक्कामोर्तब केले. या पथकाकडून प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवण्यात येईल.

मेडिकलमध्ये ऍन्टी रॅगिंग समितीतर्फे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सचिव प्रा. डॉ. उदय नारलावार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींसह
विभागाची बैठक घेतली. भारतीय वैद्यक परिषदेने नवीन अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिकावर भर दिला आहे. यामुळे एमबीबीएस प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना विविध वॉर्डात रुग्णांशी संबंधित सेवा द्याव्या लागणार आहेत. येथे नवीन विद्यार्थ्यांचा नुकताच वावर वाढणार असल्याने त्यांची रॅगिंग होऊ नये हा उद्देश असल्याचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा म्हणाले. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, यासाठी वैद्यकीय शिक्षकांचे विशेष पथक तयार करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospital squad to prevent ragging