गर्भ तपासणी करणाऱ्या रुग्णालयांना केल आरोग्य अधिकाऱ्यांनी सील!

hosp.jpg
hosp.jpg

अकोला : अवैध गर्भतपासणी आणि गर्भपाताच्या वाढत्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी मनपा आरोग्य अधिकारी सरसावले आहेत रविवारी (ता.21) शहरातील एका रुग्णालयावर छापा टाकून सोनोग्राफी ची मशीन सील करण्यात आली आहे.
मनपा आरोग्याधिकारी फारुक शेख यांनी शहरातील ऋषी नर्सिंग होम केअर या रुग्णालयावर रात्री उशिरा छापा टाकला यावेळी रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील करून रुग्णालयाला कुलूप ठोकण्यात आले.

हे प्रकरण नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या दालनात जाऊन पोहोचले रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते नर्सिंग होम चे संचालक रुपेश तेलगोटे असून यांच्यावरही रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. गर्भ पाताच्या गोळ्यांची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात होत असून यावरही ही कारवाई होणे गरजेचे असल्याचे समाजातील काही तज्ञांची मागणी आहे.

डॉक्टर रुपेश तेलगोटे या बोगस डॉक्टर सह तिघांना अटक
अकोला शहरातील दुर्गा चौका जवळच्या ऋषी होम नर्सिंग केअर या दवाखान्यावर महानगरपालिकेच्या पीसीपीएनडीटी पथकाने मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुख शेख यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी कारवाई केली. गर्भ लिंग निदान विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचे उल्लंघन आणि कागदपत्रांमधील त्रुटीसाठी या दवाखान्यावर सील करण्याची कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com