यजमान नागपूरची विजयी सलामी

नागपूर ः सुभेदार सभागृहात सुरू झालेल्या राज्य ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत चंद्रपूरविरुद्ध दुहेरीच्या सामन्यात खेळताना नागपूरचे गंधार नवले व नबील अहमद.
नागपूर ः सुभेदार सभागृहात सुरू झालेल्या राज्य ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत चंद्रपूरविरुद्ध दुहेरीच्या सामन्यात खेळताना नागपूरचे गंधार नवले व नबील अहमद.

नागपूर : यजमान नागपूर, गतविजेता ठाणे, द्वितीय मानांकित मुंबई उपनगर आणि बृहन्मुंबई जिल्हा संघाने नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित 19 वर्षांखालील राज्य आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत सफाईदार विजय मिळवून पुढील फेरी गाठली. सुभेदार सभागृहात सुरू असलेल्या स्पर्धेतील सलामी लढतीत नागपूरने चंद्रपूरचा 3-0 ने धुव्वा उडविला. मालविका बन्सोड, रोहन गुरबानी, गंधार नवले व नबील अहमद नागपूरच्या विजयाचे शिलेदार ठरले. रोहनने ऋषिकेश कहामगेला 21-11, 21-7 ने पराभूत करून नागपूरला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मालविकाने मुग्धा मोरेला 21-1, 21-2 ने नमवून आघाडी 2-0 वर नेली. त्यानंतर झालेल्या दुहेरी लढतीत गंधार व नबीलने आदित्य देरकर व सार्थक घुगलला 21-15, 21-11 ने पराभूत करून दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ठाणे जिल्हा संघाने पालघरला याच फरकाने पराभूत केले. पहिल्या एकेरीत राहुल काणेने अर्जून सुरेशला 21-10, 21-11 ने, अदिता रावने श्रिया हुडेकरला 21-19, 21-11 ने आणि दुहेरीत सुयोग लोखंडे व वेदांत काळेने आर्यन मकवाना व यश भुजबळला 21-8, 21-16 ने पराभूत केले. मुंबई उपनगरनेही रत्नागिरीवर 3-0 ने सहज विजय नोंदवून दुसरी फेरी गाठली. अथर्व जोशीने अनुरूप भगतला 21-16, 21-18 ने, मेखला अंबेकरने सृष्टी फणसेला 21-14, 21-15 ने आणि द्रुव ओझल व ध्रुव पटेल जोडीने अनुरूप व पुष्कराज कुंभारला 21-18, 19-21, 21-15 ने नमवून मुंबईला विजय मिळवून दिला. बृहन्मुंबईने अहमदनगर जिल्हा संघाला 3-0 ने पराभूत करून विजयी सलामी दिली. शुभम पाल व शिवानी हिरळेकरने एकेरी आणि राहिल पारिख व अमेय नकाशेने दुहेरी सामना जिंकून विजयात मोलाचा वाटा उचलला. अन्य सामन्यांमध्ये पुणे जिल्हा संघाने औरंगाबादचा 3-0 ने, कोल्हापूर जिल्हा संघाने वर्धा जिल्ह्याचा 3-0 ने, अहमदनगरने सोलापूरजा 3-1 ने, वर्धा जिल्हा संघाने परभणीचा 3-2 ने, नाशिकने यवतमाळचा 3-0 ने आणि रायगड जिल्हा संघाने सातारा जिल्हा संघाचा 3-1 ने पराभव केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com