सुटे पैसे दिले नाही म्हणून चिडला पिंगर विक्रेता अन्‌ केले 'छपाक'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

27 वर्षीय तरुण घराशेजारी असलेल्या दुकानात पिंगर विकत घेण्यासाठी गेला. शंभर रुपये देत त्यानी दोन रुपयाचे पिंगर विकत घेतले. मात्र, दुकानदार चिल्लरसाठी अडला. युवकाकडे चिल्लर नसल्याने असमर्थता दर्शवली. मात्र, वाद विकोपाला गेल्याने व राग अनावर झाल्याने पिंगर विक्रेत्याने चक्‍क गरम तेल युवकाच्या चेहऱ्यावर फेकले. 

यवतमाळ : दिग्दर्शक मेघना गुलजार यांचा छपाक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या चित्रपटात प्रमूख भूमिका साकारली आहे. तिने लक्ष्मी अग्रवालची भूमिका केली आहे. लक्ष्मीवर एका तरुणाने ऍसिड हल्ला केला होता. यात तिचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. यातून सावरत तिने कसे आयुष्य जगले यावर हा चित्रपट आधारित आहे. त्यातून चांगला बोध घेण्याऐवजी रागाच्या भरात हिंसक कृत्य केले जात आहे. अशीच एक मिळतीजुळती घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली.

काय झालं असावे? - लग्न होऊन झाले सहाच महिने अन्‌ पत्नीने दाखवले 'रूप', मग पतीने घेतला हा निर्णय

दोन ते तीन दिवसांपूर्वीही नागपुरातील सदर परिसरात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रयोगशाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने विभागप्रमुख महिलेवर अमोनिया हे ज्वलनशील रसायन फेकल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. थेट अंगावर अमोनिया न पडल्याने विभागप्रमुख थोडक्‍यात बचावल्या. मात्र, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बदनामी टाळण्यासाठी दोघींची समजूत घातल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.

संबंधित इमेज

विदेश पोहनकार (वय 27, रा. इंदिरानगर, लाडखेड, जि. यवतमाळ) याने शुक्रवारी (ता. 17) सकाळी सव्वानऊ वाजता घराशेजारी असलेल्या दुकानातून दोन रपयाचे पिंगर विकत घेतले. यानंतर त्याने दुकानदाराला शंभर रुपयाची नोट दिली. यावर दुकानदाराने दोन रुपयाची चिल्लर पाहिजे, असा आग्रह धरला. मात्र, तरुणाकडे चिल्लर नसल्याने त्याने असमर्थता दर्शविली.

सविस्तर वाचा - मुलांना विकणारी 'सपना शूटर' आहे तरी कोण?

तरीही दुकानदाराने चिल्लची मागणी सोडली नाही. युवक चिल्लर देत नसल्याचे पाहून दुकानदाराने कढईतील गरम तेल विदेशच्या अंगावर फेकले. यात त्याचा चेहरा जळाला. एकाएकी घडलेल्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विदेश पोहनकार या तरुणाने लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संतोष श्‍यामराव राहावे (वय 39, रा. इंदिरानगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सध्या छपाक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यातून चांगला बोध घेण्याऐवजी रागाच्या भरात हिंसक कृत्य केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hot oil thrown at a youth in Yavatmal