अकोल्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

दहा वर्षांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
 2006 - 45.0
 2007 - 45.4
 2008 - 44.4
 2009 - 46.0
 2010 - 47.2
 2011 - 45.1
 2012 - 44.8
 2013 - 46.3
 2014 - 44.2
 2015 - 46.4
 2016 - 47.1
 2017 - 45.7
 2018 - 46.9

अकाेला : राज्यातील सर्वाधिक तापमान बुधवारी अकाेल्यात (४६.९ डीग्री) नाेंद झाल्याने हवामान खात्याने जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर केले आहे. उष्णतेच्या लाटेची हीच स्थिती दोन वर्षांपूर्वी (सन २०१६) अकाेलेकरांना अनुभवायला मिळाली हाेती. 

मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला असताना विदर्भात मात्र सूर्याने राैद्र रूप धारण केले आहे. मेमध्ये सातत्याने तापमानाचा पारा ४५ डिग्रीच्या पुढे असताना सोमवारी (ता.२८) तापमानाने यंद्याच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च पातळी गाठली. राज्यातील सर्वाधिक तापमान अकाेल्याच नाेंदवण्यात आले. शहरात या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक ४६.९ डिग्री तापमानाची नाेंद झाली. दुपारच्यावेळी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तापमानाचा असा कहर अकाेलेकरांना मे २०१० आणि त्यानंतर मे २०१६ मध्ये बघावयास मिळाला. 

सन २०१० मध्ये जिल्ह्याचे तापमान ४७.२ डिग्री तर १८ मे २०१६ रोजी ४७.१ डिग्री तापमान नाेंदविण्यात आले हाेते. २०१७ मध्ये उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान १७ मे रोजी ४५.७ डिग्री नोंदविण्यात आले होते. ही स्थिती आणखी दाेन दिवस कायम राहणार असल्याने सकाळी ११ ते दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घराबाहेर निघणे टाळावे असे आवाहन हवामान प्रशासनाने केले आहे.  

दहा वर्षांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
 2006 - 45.0
 2007 - 45.4
 2008 - 44.4
 2009 - 46.0
 2010 - 47.2
 2011 - 45.1
 2012 - 44.8
 2013 - 46.3
 2014 - 44.2
 2015 - 46.4
 2016 - 47.1
 2017 - 45.7
 2018 - 46.9

Web Title: hot summer in Akola