हॉटेल मॅनेजरचा कर्मचारी महिलेवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : सदरमधील नामांकित हॉटेलमधील 21 वर्षीय कर्मचारी महिलेवर हॉटेलच्या मॅनेजरने बलात्कार केला. तिला धमकी देऊन एक लाख 25 हजार रुपये घेतले. युवतीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी मॅनेजरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अहजर अली अरमान अली (वय 24, रा. जाफर नगर) असे आरोपीचे नाव आहे. 

नागपूर : सदरमधील नामांकित हॉटेलमधील 21 वर्षीय कर्मचारी महिलेवर हॉटेलच्या मॅनेजरने बलात्कार केला. तिला धमकी देऊन एक लाख 25 हजार रुपये घेतले. युवतीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी मॅनेजरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अहजर अली अरमान अली (वय 24, रा. जाफर नगर) असे आरोपीचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरमधील छावणीत राहणारी पीडित 21 वर्षीय युवतीची हॉटेल मॅनेजमेंटची पदविका झाली असून सदरमधील बब्बू गॅलक्‍सी हॉटेलमध्ये 2018 मध्ये नोकरीला लागली होती. याच हॉटेलमध्ये अजहर अली हा हॉटेल मॅनेजर म्हणून नोकरीला होता. युवतीकडे ग्राहकांच्या ऑर्डर लिहून घेणे आणि शेफपर्यंत पोहोचण्याचे काम होते. दरम्यान, मॅनेजर अजहरशी तिची ओळख झाली. अजहरने तिला जाळ्यात ओढून तिच्याशी मैत्री केली. रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये काम केल्यानंतर तो घरी सोडण्याचा बहाणा करीत होता. मॅनेजर असल्यामुळे तीसुद्धा अजहरसोबत घरी जात होती. या दरम्यान अजहरने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो 25 डिसेंबर 2018 ला तिच्या घरी गेला. त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्याने बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा पीडित युवतीने केला. त्यानंतर तो वारंवार घरी येऊन शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. 
दरम्यान, तिच्याकडून तब्बल 1 लाख 25 हजार रुपये घेतले. काही महिन्यांनंतर तिने पैसे परत मागितले असता त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिनेही लग्न करणार म्हणून संबंध पूर्वरत ठेवले. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून तो पैसे देण्यास आणि लग्न करण्यास नकार देत होता. लग्नाचा तगादा लावल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे कंटाळून युवतीने सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून मॅनेजर अजहर अलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel manager rapes woman