अनैतिक संबंधातून हॉटेलमालकाचा खून

file photo
file photo

नागपूर : हॉटेलचालकाने प्रतिस्पर्धी हॉटेलचालकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले. हे संबंध उघडकीस आल्यामुळे शनिवारी मध्यरात्री एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. जखमी हॉटेलमालक महेश वरयानी (27, रा. आराधना अपार्टमेंट, पॉवरग्रिड चौक) याचा सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी आकाश छाबडा (31) व दीपेश छाबडा (27, रा. पॉवरग्रिड चौक) यांना अटक केली आहे.
महेशचे मिर्च मसाला नावाने रेस्टॉरेंट आहे. आरोपी आकाशचे किचन किंग नावाने रिंगरोडवर रेस्टॉरेंट आहेत. आकाश व महेश एकाच परिसरात राहतात. महेशच्या पत्नीसोबत आकाशचे तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची बाब उजेडात आली. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांत तणाव आहे. दोन्ही कुटुंबांत यावरून अनेकदा बैठक झाली. परंतु, वाद सुटला नाही. 22 जूनला मध्यरात्री 2.30 महेश हा रेस्टॉरेंट बंद करून पत्नीसह घरी जात असताना आकाश व दीपेश त्यांना अडवले व महेशच्या डोक्‍यावर बिअरची बॉटल फोडली. चाकूने पोटावर व छातीवर वार करून आरोपी पळून गेले. पत्नीने महेशला रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक प्रभात पाटील यांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. महेशचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचे कलम वाढवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com