येथे संचारबंदीतही उघडतात हॉटेल, हेअर सलून आणि पानपट्टी

lakhanwada.jpeg
lakhanwada.jpeg

लाखनवाडा (जि.बुलडाणा) : राज्यासह संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन असून, राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यानुसार पाच जण एका ठिकाणी गोळा होवू शकत नाही, मात्र खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे नियमांचे सर्रास उल्लघंन होत आहे. सकाळी सात ते नऊ दरम्यान पानपट्टी धारक व हॉटेल, हेअर सलून, मटन दुकान नेहमीप्रमाणे उघडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवशी एक प्रकारे खेळच याठिकाणी सुरू आहे.

पोलिस, महसूल विभागाच्या नियमांची ऐसीतैसी होत आहे. पोलिस प्रशासन दिवसभर नागरिकांना व दुकानदारांना समज देवून सुध्दा एकेत नाही. काही वेळी नागरिक पोलिसांशी वादविवाद करतात. यामुळे पोलिस यंत्रणा वाढवून शासनाने घालून दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाला मोडणाऱ्या ग्रामस्थांवर व जीवनाश्‍यक वस्तुचे दुकाने आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू ठेवावे असे आदेश असून नियमाचे पालन करताना कोणी दिसत नाही. 

ग्रामस्थ एकत्र येवून बसतात
त्यामुळे या आजाराचे संक्रमन होवून रुग्ण वाढत असल्याचे चित्र देशात आहेत. यापासून धडा घेवून तरी ग्रामस्थांनी सामाजिक अंतर राखून गावात करणे गरजेचे आहे. तर लाखनवाडा येथे वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र येवून बसत असल्याचे चित्र आहे. यात मुंबई, पुण्यावरुन येणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अनावश्यकरित्या फिरणाऱ्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com