भूकंपाच्या हादऱ्याने घरे भेगाळली

file photo
file photo

आर्णी : शुक्रवारी सायंकाळी 9:10 मिनिटांनी पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी रस्त्यावर पळ काढला. त्याला कारणही तसेच होते. भूकंपाच्या हादऱ्याने घरे हलायला लागली. घरावरील टिनाचा, घरातील भांड्यांचा आवाज येऊ लागला तर बाहेर असणाऱ्या लोकांना घरेच हलताना दिसली आणि क्षणार्धात संपूर्ण ग्रामस्थांनी घरे सोडून रस्त्यावर पळ काढला. भूकंपाचा हादरा असल्याचे कळून चुकले आणि मग मोबाईलवरून भूकंपाची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने शहरात भीतीचे वातावरण होते.
आर्णी तालुक्‍यातील साकूर, मुकिंदपूर, कवठा बाजार, दोनवाडा, अंजनखेड, राणी धानोरा, ईचोरा, दहेली, अंबोडा, चिचबर्डी, कृष्णनगर, ईवळेश्वर, दितोडी, माळेगाव, कोसदनी या गावांतील घरे हादरली. साकूर येथील मधुकर शिंदे, प्रकाश पवार, कोसदनी येथे विजय दवने, रमेश धनबा ठाकरे, लहानुजी महाराज प्रतिष्ठान, अंजनखेड येथे चरणदास टेकाळे, श्‍याम टेकाळे, रामदास कुंडकर, जनार्दन रोडगे यांच्या घराच्या भिंतींना भेगा पडल्या तर चंद्रकला पेंदोर या महिलेच्या घरातील शौचालयाला भेगा पडल्या. सुदैवानं कोणतेही मोठी वित्तहानी व जीवित हानी झालेली नाही.
प्रशासकीय यंत्रणा तत्पर; रात्रीच गावांना भेटी
भूकंपाच्या झटक्‍याने तालुक्‍यातील हादरलेल्या गावाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी सज्ज झाले. प्रभारी तहसीलदार यू. डी. तुंडलवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रात्री तीन वाजेपर्यंत पैनगंगा नदीकाठावरील गावांना भेटी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com