किती दिवस त्रास सोसणार नागपूरकर?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

किती दिवस त्रास सोसणार नागपूरकर?
नागपूर : शहरात डेंगी व मलेरियाचा प्रकोप वाढला. मोकाट जनावरे रस्त्यावर असून अपघात वाढले व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आणखी किती दिवस नागपूरकरांनी मनस्ताप सहन करावा, असा सवाल करीत मनसेने महापौर नंदा जिचकार यांचा घेराव केला. प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौरांना समस्यांसाठी जाब विचारला.

शहरात डेंगी व मलेरियामुळे प्रत्येक घरात रुग्ण आहेत. साथीच्या रोगामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. मात्र, आरोग्य विभाग उदानीस दिसून येत असल्याकडे महापौरांचे लक्ष वेधत मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यांनी शहरातील रस्त्यावरील मोकाट जनावरे, खड्डे, फुटपाथवरील अतिक्रमण, मनपा शाळेची दुरावस्था, रुग्णालयाची दुर्दशा, महिलांसाठी प्रसाधनगृहाची कमतरता, पार्किंग व्यवस्थेबाबत महापौर नंदा जिचकार यांच्यापुढे प्रश्‍न उपस्थित केले. विकासकामांच्या नावावर नागपूरकरांना आणखी किती दिवस छळणार?, या नागरी समस्यांचे तत्काळ निराकरण करा, अशी मागणी गडकरी यांनी केली.
शहर अध्यक्ष अजय ढोके, विशाल बडगे, उपाध्यक्ष प्रशांत निकम, रजनीकांत जिचकार, महिला सेनेच्या शहर अध्यक्ष मनीषा पापडकर, सचिव घनश्‍याम निखाडे, शाम पुनियानी, विभाग अध्यक्ष चंदू लाडे, शशांक गिरडे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आदित्य दुरुगकर, वाहतूक सेनेचे सरचिटणीस सचिन धोटे, मंगेश शिंदे, कल्पना चव्हाण, मंजुषा पानबुडे, मालती अमृतकर, कांता उमरे, शुभम पिंपळापुरे, मनोज जिवटकर, धीरज गजभिये, सुमित वानखेडे, अभय व्यवहारे, राजू पत्राळे आदी उपस्थित होते.

Web Title: How many times suffer?