आदित्य डोकवाल शहरात प्रथम

HSC-Result
HSC-Result

नागपूर - बारावीच्या परीक्षेत शहरातून दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य डोकवाल याने ९८ टक्‍क्‍यांसह (६३७) शहरात प्रथम पटकावला. तो सायन्सचा विद्यार्थी आहे. वाणिज्य शाखेतून गांधीबागेतील आदर्श विद्यामंदिरची विद्यार्थिनी निधी सूचक हिने ९६.३० टक्के, कला शाखेतून ‘एलएडी’ महाविद्यालयाच्या राधा ठेंगडीने ९७ टक्के तर एमसीव्हीसी शाखेत जी. एस. कॉमर्सच्या पल्लवी यादवने ८४.९२ टक्के गुणांसह आपापल्या शाखेत प्रथम स्थान पटकाविले. तसेच विज्ञान शाखेत दुसऱ्या स्थानावर असलेला आंबेडकर महाविद्यालयातील योगेंद्र गौतम हुमने हा मागासवर्गीयातून प्रथम आला आहे. त्याने ९७.५ (६३४) टक्के गुण मिळविले.  

सेंट पॉल स्कूलचा अनमोल अरोरा याने ९७.४ टक्के मिळवीत तिसरे स्थान पटकावले. वाणिज्य शाखेत याच महाविद्यालयातील सोनाली भट, श्रेया दांडेकर, जी. एस. कॉमर्सची अंजू थॉमस यांनी ९५.३८ टक्‍क्‍यांसह संयुक्तपणे द्वितीय स्थान मिळविले. भार्गवी वनकर हिने ९५.२३ टक्के गुण मिळवीत तिसरे स्थान मिळविले. कला शाखेत दुसऱ्या स्थानावर अनन्या आचार्य, आर्या दीक्षित यांनी ९३ टक्‍क्‍यासह संयुक्तपणे द्वितीय स्थान मिळविले. ९२ टक्‍क्‍यांसह हिस्लॉप कॉलेजच्या जुही चौधरीने तिसरा क्रमांक पटकावला.

नाईट स्कूलमधून हुझैफा फरहाज अयाज अहमत याने ७७ टक्के गुण मिळवीत प्रथम स्थान मिळविले. नागपूर विभागातून एक लाख ४४ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ७० हजार ३५६ मुले तर ७३ हजार ८१४ मुलींचा समावेश होता. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८४.२४ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९१ टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com