अमरावती परिसरात मानवी हाडे सापडली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

अमरावती : दहा दिवसांपूर्वी वलगाव हद्दीत शेतात मानवी सांगाडा सापडल्यानंतर पुन्हा मागील बारा तासात ग्रामीण व शहरात दोनठिकाणी अर्धवट मानवी सांगाडे आढळले. कापूसतळणी व शहरातील छत्रीतलाव मार्गावर या घटना उघडकीस आल्या.

जिल्ह्यातील माहुली जहॉंगीर ठाण्याच्या हद्दीत कापूसतळणी गावात सटोई नाला आहे. या नाल्यामध्ये मानवी सांगाड्याची अर्धवट हाडे आढळली. काही हाडांचे तुकडे नाल्याच्या काठावर पडून होते. पिकलेले केससुद्धा त्या ठिकाणी दिसून आले. पोलिस पाटील यांनी माहुली जहॉंगीर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नाल्याच्या काठावर आढळलेली मानवी हाडे पोत्यात जमा केली. उत्तरीय तपासणीसाठी ती जिल्हा रुग्णालयात आणली. मृत व्यक्ती महिला किंवा पुरुष हे अद्याप निश्‍चित झाले नाही. पांढरे केस आढळल्याने मृत व्यक्ती वृद्ध असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच छत्रीतलाव मार्गावर एका मंदिरामागे असलेल्या नाल्यातही मानवी हाडे सापडली आहेत. ती राजापेठ पोलिसांनी जप्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human bones were found in Amravati area

टॅग्स