अवकाळी पावसासह गारपिटीने शेकडो एकरातील पिकांची नासाडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

यंदा सुरवातीला झालेल्या परतीच्या पावसाने खरिपातील सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बीतील गहू हरभऱ्याची पेरणी केली. मात्र आज(ता.2) सकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने देगाव, देपुळ,कुंभी परिसरातील गहू, हरभरा, तूर, कपाशी, भाजीपाला पिकांच नुकसान झालं आहे. मानोरा तालुक्यातील भुली विठोली परिसरात सुध्दा पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळं आधीच संकटात असलेल्या शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. 

वाशीम:  यंदा सुरवातीला झालेल्या परतीच्या पावसाने खरिपातील सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बीतील गहू हरभऱ्याची पेरणी केली. मात्र आज(ता.2) सकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने देगाव, देपुळ,कुंभी परिसरातील गहू, हरभरा, तूर, कपाशी, भाजीपाला पिकांच नुकसान झालं आहे. मानोरा तालुक्यातील भुली विठोली परिसरात सुध्दा पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळं आधीच संकटात असलेल्या शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. 

मागील तीन वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणारा वाशीम जिल्ह्यातील शेतकरी आज झालेल्या गारपिटीने उध्वस्त झाला आहे. आज सकाळी सहा वाजता संपूर्ण जिल्हाभर पावसाला सुरुवात झाली होती. पावसाबरोबर वाशीम तालुक्यात देगाव कुंभी परिसरात तुफान गारपीट झाली. तसेच मानोरा तालुक्यात भुली विठोली परिसरही गारपिटीने उध्वस्त झाला. या गारपिटीने गहू, हरभरा, तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले भाजीपाला पिके तर नष्ट झाली आहेत. अवकाळीनंतर आलेल्या या अस्मानी संकटाने शेतकरी कोलमडून गेला आहे. प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

हेही वाचा - रात्री अचानक पडली तीन मजली इमारत

Image may contain: plant, tree, flower, outdoor and nature

तात्काळ हवी मदत
वाशीम तालुक्यातील देगाव येथील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी केली. येथील गहू ओंब्या वर आल्या असून हरभऱ्याला सुद्धा दाणे तयार झाले आहेत. मात्र, अचानक झालेल्या गारपिटीने गावातील दोनशेहुन अधिक एकरातील या पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
- सुनील चव्हाण, शेतकरी देगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of acres of crops were destroyed by hailstorm with premature rains