शंभरसाठी काळाबाजार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नागपूर - पाचशे आणि हजाराच्या नोटा खिशात असूनही सामान्यांना पायपीट करावी लागत असताना 100 रुपयाच्या नोटांचा काळाबाजार केला जात आहे. 100 रुपये हवे असल्यास 20 ते 30 टक्के कमिशन उकळण्याचा काळाबाजार नागपुरातही सुरू आहे.

जुन्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 100 रुपये तसेच सुट्या पैशांना महत्त्व प्राप्त झाले आहे. बॅंक तसेच एटीएममधूनही पुरेशा प्रमाणात या नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा मिळत असल्या तरी सुट्या पैशांच्या टंचाईमुळे त्या वटत नसल्याने या त्रासात अधिकच भर पडताना दिसत आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांपेक्षा पूर्वीपासून चलनात असलेल्या शंभर रुपयांना मागणी वाढली आहे. बाजारातील या टंचाईसदृश परिस्थितीमुळे शंभर रुपयांचा एकगठ्ठा साठा असणारे त्याचा काळाबाजार करू लागले आहेत. दलालांकडून या नोटांच्या माध्यमातून जुन्या नोटा वटविण्याचे उद्योगही जोरात सुरू झाल्याची चर्चा आहे. इतवारी, गांधीबाग या बाजारात हे दलाल सक्रिय झाले आहेत.

Web Title: Hundreds of black market