शेकडो वस्त्यांवर काळोखाचे सावट

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नागपूर: वर्धा, नागपूर जिल्ह्यातील पथदिवे योजनांचे तब्बल 57.43 कोटी थकीत आहेत. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली. थकबाकी असलेल्या पाणीपुरवठा आणि पथदिवे योजनांवरही कारवाईच्या पवित्र्यात महावितरण असून, या दोन्ही जिल्ह्यांवरील अंधाराचे सावट गडद झाले आहे.

अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या महावितरणने थकबाकी वसुलीवर भर दिला. अनेक थकबाकीदारांकडील वीजपुरवठा खंडित केला. थकबाकी असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. आता पथदिव्यांची थकबाकी असणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

दोन्ही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3997 वीज जोडण्यांवर तब्बल 57 कोटी 43 लाखांची थकबाकी आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यात पथदिव्यांच्या 2716 ग्राहकांकडे 42 कोटी 84 लाख तर वर्धा जिल्ह्यातील 1281 ग्राहकांकडे 14 लाख 59 लाखांची थकबाकी आहे.

वसुलीसाठी आक्रमक निर्णय घेतले जातील. प्रसंगी वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर भूमिकाही घ्यावी लागेल. याबाबत महावितरणने संबंधितांना इशाराही दिला असल्याची माहिती महावितरणच्या अंतर्गत सूत्रांनी दिली.

थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिला आहे. त्यानुसार महावितरण आक्रमकतेने कारवाई करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणून परिमंडळातील लघुदाब ग्राहकांकडून चालू वीजबिलाचे 72 कोटी वसूल करण्यात यश आले आहे.

Web Title: Hundreds of households in the dark shadow