शेकडो क्‍विंटल धान पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नवेगावबांध (जि. गोंदिया) - येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नाही. त्यामुळे १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. असे असतानाच रविवारी व सोमवारी आलेल्या पावसाने शेकडो क्विंटल धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शासनाने त्वरित उपाययोजना करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानभरपाईबाबत शासन कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. 

महिन्याभरापूर्वी शेतकी खरेदी-विक्री संघ अर्जुनी मोरगावच्या वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. 

पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मात्र, पंधरा दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच बारदान्याची टंचाई निर्माण झाली. केंद्रावरून बारदाना पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, बारदाना अद्याप पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी, बाजार समितीतून अधिक पैसे मोजून बारदाना विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. १५ रुपये किमतीच्या एका पोत्यामागे २० ते २५ रुपये मोजावे लागले. यात अल्पभूधारक व आर्थिक टंचाई असलेल्या शेतकऱ्यांची बारदाना विकत घेण्यास मोठी अडचण झाली. कित्येक शेतकऱ्यांनी मळणी करून धान खरेदी केंद्रावर आणला. उपबाजार समिती यार्डाची साठवणूक क्षमता संपल्याने हे केंद्र आता पुगलिया राइस मिलमध्ये सुरू करण्यात आले. परंतु, बारदान्याअभावी शेकडो क्विंटल धान उघड्यावरच ठेवण्यात आले. दरम्यान, रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसात हे धान भिजले. कसेबसे आच्छादन टाकून शेतकऱ्यांनी धानाला पाण्यापासून वाचविण्याचा आटापिटा केला; मात्र तोही पुरेसा ठरला नाही.

नऊ केंद्रांवर टंचाई
अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात नऊ केंद्रे आहेत. या नऊही केंद्रांवर बारदान्याची टंचाई आहे. या केंद्रांवर ज्या शेतकऱ्यांनी स्वतःचा बारदाना नेला, त्यांच्याच धानाची खरेदी केली जाते. उर्वरित शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पाडून ठेवले जाते. खरेदी-विक्री संस्थेच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना प्रति बारदाना १५ रुपये देण्याचा प्रस्ताव आला. परंतु, काही संचालकांनी याला विरोध करून शेतकऱ्यांची पंचाईत केली आहे.

Web Title: Hundreds of quintal grains in the water