राज्यातील होमगार्डवर उपासमारीची वेळ; वाचा कारण काय?

राज्यातील होमगार्डवर उपासमारीची वेळ; वाचा कारण काय?

नागपूर ः पाच महिन्यांपासून राज्यातील होमगार्डला मानधन मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात गेले असताना आता परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. होमगार्ड कार्यालयात पगारी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन होत असताना मानसेवी होमगार्डला मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

होमगार्डला ऑगस्ट महिन्यापासून विविध बंदोबस्ताच्या माध्यमातून कर्तव्यावर नेमलेले आहेत. त्यात गोकुळाष्टमी, पोळा, गणपती, मोहरम, हाडपक्‍या गणपती, दुर्गादेवी, निवडणूक, राम जन्मभूमीच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी, ईदचा बंदोबस्ताचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते नोव्हेंबरपर्यंतचे मानधन अद्याप राज्यातील होमगार्डला मिळालेले नाही. याच काळात दसरा, दिवाळी हे अत्यंत महत्त्वाचे सण झाले. दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी होमगार्डचे मानधन करण्यात आले नाही. त्यामुळे होमगार्डची दिवाळी अंधारात गेली आहे. दिवाळीच्यापूर्वी "सकाळ'ने होमगार्डची दिवाळी अंधारात जाणार असे वृत्त प्रकाशित केले होते.

दरम्यान, राज्य शासनाने 25 ऑक्‍टोबरपूर्वी सर्वांचे वेतन व भत्ते देण्यात यावे असे पत्र काढले होते. त्या पत्राला होमगार्ड महासमादेशक कार्यालयाने केराची टोपली दाखविल्याने होमगार्डचे मानधन झाले नसल्याचे आरोप होत आहे. मानधन कधी होणार यासंदर्भात होमगार्ड महासमादेशकांच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता प्रतिसाद मिळत नसल्याने होमगार्डमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. होमगार्ड हा मानसेवी सैनिक असल्याने बंदोबस्तासाठी तैनातीचे आदेश येताच नियमात कामे सोडून बंदोबस्तासाठी हजर होत असतात. बंदोबस्तासाठी हजर न झाल्यास होमगार्डला जिल्हा समादेशकाला खुलासा द्यावा लागतो. असे असताना होमगार्डचे मानधन तब्बल पाच महिन्यांपासून झालेले नाहीत. त्यामुळे परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
 
होमगार्ड हवामानाची तमा न बाळगता उन्हाळा, पावसाळा, थंडीत पोलिसांच्या खाद्यांला खादा देत बंदोबस्तात तैनात असतात. पोलिसांना नियमित पगार होत असताना मानसेवी असलेल्या होमगार्डला मात्र, मानधन मात्र वेळेवर मिळत नाही ही शोकांतिका आहे.
- नामदेव खानझोडे, अध्यक्ष, होमगार्ड पोलिस असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com