फुलसावंगी येथे पती-पत्नीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : येथील फकिरा गणपत पिटलेवाड (वय 25) यांनी गावातील वॉर्ड क्रमांक तीनमधील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.8) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच फकिरा यांची पत्नी नीलाबाई (वय 20) हिनेही गळफास लावून आत्महत्या केली.

मंगळवारी सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना फकिरा यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच फकिराची पत्नी व आई हे त्याच्या सासरवाडीला गेलेले होते. ते सोमवारी सायंकाळी गावात परतले. त्यानंतर त्यांना फकिरा घरी दिसला नाही. त्याच्या आईने मोलमजुरीच्या कामावर चौकशी केली असता, तो दिवसभर आलाच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोघींनी फकिराची वाट पाहिली. दरम्यान, मंगळवारी सकाळी विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची वार्ता गावात पसरली. ही बाब फकिराच्या आईला सांगण्यात आली. विहिरीतील मृतदेह हा फकिराचाच असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर या घटनेची माहिती नीलाबाई फकिरा पिटलेवाड (वय 20) हिला समजली. त्यानंतर तिने घरात दोराच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या दाम्पत्याला अपत्य नसल्याचे समजते. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife commit suicide at Phoolsawangi