कुलरचा शॉक लागून पती, पत्नीचा दुर्देवी मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहचले व पंचनामा करीत दोन्ही मृत देह पोस्टमार्टम करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. इरफान व नाजियाच्या विवाहाला दिड वर्षे झाले असून त्यांना २ महिन्यांचे बाळ आहे. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 

अमरावती : अमरावती शहरातील मुस्लिम बहुल परिसर असलेल्या नालसाबपूरा येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कुलरचा शॉक लागून पती पत्नीचा दुर्देवी मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

पोलिस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, नाजिया परवीन इरफान शहा हि कुलरमध्ये पाणी रात्री पाणी भरत होती. पाणी भरत असतांना कुलर सुरु होता व अचानकच कुलरचा शॉक नाजियाला बसला व ती ओरडली. हाच आवाज एकूण तिला वाचविण्याकरिता तिचा पती मो.इरफान धावला व तिला पकडले असता त्यालाही जोरदार शॉक बसला. त्याचा आवाज एकूण आजूबाजूचे शेजारीही धावले. मात्र त्यांना वाचविता आले नाही. यामध्ये दोघेही पती पत्नीचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहचले व पंचनामा करीत दोन्ही मृत देह पोस्टमार्टम करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. इरफान व नाजियाच्या विवाहाला दिड वर्षे झाले असून त्यांना २ महिन्यांचे बाळ आहे. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 

Web Title: husband and wife dead on electricity shock