पत्नीची हत्या करण्यापूर्वीच पतीला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नागपूर ः गेल्या दीड वर्षापासून माहेरी गेलेली पत्नी नांदायला परत येत नसल्यामुळे चिडलेल्या पतीने तिचा खून करण्याचे ठरविले. कोयता घेऊन खून करण्यासाठी दबा धरून बसलेल्या व्यक्‍तीला धंतोली पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणाची आज दिवसभर शहरात चर्चा होती. पोलिसांवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्‍यामसिंग रामहित खेंगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोली पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोबाईल व्हॅनने पॅट्रोलिंग करीत असताना त्यांना आरोपी श्‍यामसिंग रामहित

खेंगर (52, रा. चुनाभट्टी, धंतोली) हा एफसीआयच्या गोडाउनच्या भिंतीजवळ लपून बसलेला दिसला. त्याच्या संशयास्पदरीत्या हालचाली पाहून पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता तो काहीतरी लपवीत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार कोयता आढळला. पंचासमक्ष त्याच्याजवळील शस्त्र ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याची पत्नी दीड वर्षापासून सोबत राहत नसल्याने त्याचा मनात राग धरून तिला ठार मारण्यासाठी हे शस्त्र आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले. आरोपीची पत्नी ही त्याच्यापासून दीड वर्षापासून सोबत राहत नसल्याने आरोपीच्या मनात राग धरून तिला मारण्याच्या बेतात असताना पोलिस कर्मचाऱ्यांच्या पॅट्रोलिंग व सतर्कतेमुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा होण्यापासून टळला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांच्या पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रेमचंद तिवारी, पोलिस शिपाई राजेद्र खंडाते, दिनेश घुगे, बाळू जाधव, किशोर धनावत यांनी केली.
आज "गेम' करतो
पत्नीची काही युवकांशी मैत्री होती. ती मैत्री पतीला खटकत होती. त्यामुळे ती त्याला सोडून दुसरीकडे राहायला गेली. आरोपी श्‍यामसिंगने 12 व 15 वर्षांच्या दोन्ही मुलांना "आज तुमच्या आईचा "गेम खल्लास' करतो, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्याने काही दिवसांपूर्वीच कोयताही विकत घेतला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband arrested before killing his wife