चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर हल्ला, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

crime
crime

आर्णी (जि. यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला जखमी केले. आणि स्वत: विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या दरम्यान महागाव शिवारात घडली.

प्रवीण मनवर (वय २९, रा. महागाव) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. पती-पत्नी दोघेही चिकणी येथे राहणाऱ्या आजीला भेटून आपल्या गावी महागावकडे दुचाकीने जाण्यासाठी निघाले. कोपरा गावाच्या अलीकडे महागाव शिवारात दुचाकी थांबवून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद केला. चाकूने डोक्‍यावर व गळ्यावर वार करून तिला जखमी केले. जखमी पत्नीवर यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी अश्‍विनी (वय २९, रा. संदीप मंगलम) हिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पती प्रवीण मनवर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास आर्णी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश हिरूळकर करीत आहेत.

विहिरीत उडी टाकल्याचा बनाव
महागाव शेतशिवारात पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यावर पती प्रवीण मनवर याने घटनास्थळालगत असलेल्या विहिरीत पायातील बूट टाकून आत्महत्या केल्याचा बनाव केला. घटनास्थळी दाखल झालेल्या आर्णी पोलिसांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता, काहीच हाती लागले नाही. पती प्रवीण याने दौलत (काळी) येथे जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर यवतमाळातील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती आर्णी पोलिसांना मिळाली.


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com