पथ्रोट येथे पतीने घेतला गळफास, पत्नी मृतावस्थेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पथ्रोट (जि. अमरावती) : घरात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर पत्नी मृतावस्थेत पलंगावर पडलेली आढळली. ही घटना येथील वॉर्ड क्रमांक दोन तेलंखडी येथे घडली. मृत पतीचे नाव गजानन धर्माजी कैकाडे (वय 35), तर ज्योत्स्ना गजानन कैकाडे असे मृत पत्नीचे नाव आहे.
आज, मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गजानन कैकाडे यांनी गळफास घेतल्याचे तर पत्नी मृतावस्थेत पलंगावर पडून असल्याचे नातेवाइकांना दिसून आले. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. घटनेची माहिती पोलिस ठाण्याला दिल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बातमी लिहिस्तोवर पंचनामा सुरू होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband comits suicide, wife found dead