पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नागपूर : परपुरुषासोबत पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. 

नागपूर : परपुरुषासोबत पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. 

सुनिता अमोल खंडारे (वय 26) आणि नायरण घोरई अशी आरोपींची नावे आहेत. तर अमोल भाऊराव खंडारे (वय 32, रा. इसासनी) असे मृत पतीचे नाव आहे. अमोल आणि सुनिता दोघेही मोंढा परिसरातील एमकेएस प्लास्टिक कंपनीत रोजंदारीच्या कामावर होते. त्या ठिकाणी नारायण घोरई हा पर्यवेक्षक होता. कामाच्या ठिकाणी सुनिता व नारायण यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती अमोलला मिळाली. त्याने अनेकदा पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकायला तयार नव्हती. 20 डिसेंबरला दुपारी 4 च्या सुमारास अमोल हा घरी परतला असता पत्नी सुनिता ही नारायणसोबत आक्षेपार्ह परिस्थितीत सापडली. त्यावेळी तिघांमध्ये जोरदार भांडण झाले.

भांडणानंतर अमोल हा घराबाहेर निघून गेला व वेणा नदीच्या कातळावरील एका झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून भाऊराव नामदेव खंडारे (वय 55) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.

Web Title: Husband commit suicide for his wife s immoral relationship

टॅग्स